राज्यातील इंग्रजी शाळेतल्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा, 25 टक्के शुल्ककपात
बातमी शिक्षण क्षेत्रातील. राज्यातल्या 18 हजार इंग्रजी शाळेतल्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. (English medium school students)
मुंबई : बातमी शिक्षण क्षेत्रातील. राज्यातल्या 18 हजार इंग्रजी शाळेतल्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. (English medium school students) मेस्टा संघटनेकडून 25 टक्के शुल्ककपात (English medium school fee) करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे 18 हजार शाळेतील विद्यार्थी आणि पालकांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच कोरोनामुळे पालक गमावलेल्यांना मोफत शिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यातल्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी अखेर 25 टक्के शुल्ककपात केली. शाळांच्या मेस्टा या संस्थेने हा निर्णय जाहीर केला आहे. तसेच दोन्ही पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांचं मोफत शिक्षण देण्याचा महत्वाचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. अनेक पालकांनी शुल्क न भरल्याने शाळा चालवणे अवघड झाले आहे. त्यातच सर्वोच्च न्यायालयाने 15 टक्के फी करण्याचं सूचित केले होते. त्यामुळे मेस्टाने हा निर्णय घेतला आहे. या लाभ राज्यातल्या 18 हजार शाळांतील विद्यार्थ्यांना होणार आहे.