स्मार्ट शहराबरोबर ग्रीन शहर व्हायला हवे : मुनगंटीवार
शहर केवळ स्मार्ट सिटी होऊऩ जमणार नाही तर स्मार्ट शहराबरोबर ग्रीन शहर करण्यासाठी पर्यावरणाचा स्मार्ट विचाराचा मुलमंत्र जनतेपर्यंत पोहोचला पाहिजे.. शहरात वृक्षारोपण करणे गरजेचं आहे, असं मत राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केलाय.
पिंपरी : शहर केवळ स्मार्ट सिटी होऊऩ जमणार नाही तर स्मार्ट शहराबरोबर ग्रीन शहर करण्यासाठी पर्यावरणाचा स्मार्ट विचाराचा मुलमंत्र जनतेपर्यंत पोहोचला पाहिजे.. शहरात वृक्षारोपण करणे गरजेचं आहे, असं मत राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केलाय.
वनमंत्री सुधीर मुनगंटीवार पिंपरीत बोलत होते. तसेच तीन दिवसात राज्यात १ कोटी ६८ लाख ७८ हजार ७०० वृक्षांची लागवड झाल्यांची माहितीही त्यांनी दिली. यावेळी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने आयोजित वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ मुनगंटीवार यांच्या हस्ते झाला.