चंद्रपूर : ग्रीन झोन असणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. जिल्ह्यात दुसरा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडला आहे. शहरात यवतमाळ येथून आलेली तरुणी कोरोना बाधित असल्याचे करण्यात आलेल्या चाचणीत उघड झाले आहे. त्यामुळे शहरातील बिनबा गेट परिसरात प्रतिबंधित क्षेत्राचे नियम लागू होणार आहेत. त्यामुळे येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्यात येत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही तरुणी आपल्या आईच्या उपचारासाठी यवतमाळ येथे गेली होती. ९ मे रोजी कारने आई-भावासह चंद्रपुरात ती आली होती. ११  मे रोजी तरुणीची सॅब तपासणीसाठी घेण्यात आले होते. तिचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तर तिची आई आणि भावा रिपोर्ट प्रलंबित आहे. जिल्ह्यात दुसरा पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीची बैठक घेतली असून उपाय योजनांची आखणी केली आहे.



चंद्रपूर येथे पहिला रुग्ण २ मे रोजी सापडला होता. बंगाली कॅम्प परिसरातील कृष्णनगर भागात हा रुग्ण आढळून आला. त्यांनतर येथील परिसर सील करण्यात आला होता. १ मे रोजी हा रुग्ण कोविड चाचणीसाठी गेला होता. त्यावेळी त्याचा सॅब घेण्यात आला होता. त्यानंतर कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले. दरम्यान, त्याच्या संपर्कात आलेल्या पत्नी आणि मुलीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता.