रायगड : शनिवार, रविवार आणि सोमवार अशा सलग 3 सुट्ट्या जोडून आल्या आहेत. अपवादात्मक भाग सोडता राज्यात पूर्णपणे अनलॉक करण्यात आलंय. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक जण घरी बसून वैतागलेत. त्यात आता सलग जोडून आलेल्या विकेंड सुट्ट्यांमुळे अनेक जण बाहेर फिरायला जाण्याच्या बेतात आहेत. मुंबईनजीक असल्याने तसेच अनेक टूरिस्ट पॉइंट असल्याने पर्यटक लोणावळ्याला चोर मार्गाने जात आहेत. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात गर्दी होऊन कोरोना नियमांचं उल्लंघन होण्याचा धोका आहे. त्यामुळे लोणावळा पोलिसांनी खबरदारी म्हणून नाकाबंदी सुरु केली आहे. (Growing crowd of tourists in Lonavala police started blockade)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाकाबंदी सुरु 


लोणावळ्यात वाढती गर्दी पाहून पोलिसांनी नाकाबंदी सुरू केली आहे. लोणावळ्यामधील पर्यटकांचे मुख्य आकर्षण असलेल्या भुशी धरण,टायगर पॉईंट आणि लायन्स पॉईंटकडे जाणाऱ्या रस्त्यावर पोलिसांकडून नाकबंदी करण्यात आली आहे. मुंबई, पुण्याहून आलेल्या पर्यटकांना लोणावळा शहर पोलीस पुन्हा माघारी पाठवत आहेत. मात्र पर्यटनस्थळ बंदी आणि जमावबंदी असल्याने पर्यटकांचा हिरमोड होत आहेत. त्यामुळे तुम्हीही अतिउत्साहात चोर मार्गाने लोणावळ्याला जाण्याच्या बेतात असाल, तर घरीच थांबा. नाहीतर तुम्हालाही माघारी परतावं लागेल.