योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : जीएसटी, नोटाबंदीचा फटका जसा सर्वसामान्यांना बसला तसाच व्यापार-उद्योगालाही बसला.. अगदी दिवाळीसणापर्यंत याचा परिणाम कायम राहिला.. त्यामुळे पाडव्याच्या मुहूर्तावर सुरु झालेल्या नव्या व्यापाराची सुरुवात काहिशी निरुत्साही झाली...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वर्षभरापूर्वी दिवाळीनंतर नोटबंदी जाहीर झाली होती. त्याचा परिणाम सोने खरेदीवर झाला.. वर्षभर सराफा बाजारावर याचा परिणाम राहिला.. अगदी धनत्रयोदशीपर्यंत हे चित्र कायम होतं.. यामुळे आता सोने आयात ही निम्म्याने घटणार असल्याचं दिसून येतंय.. दिवाळीतील चार दिवस सराफा बाजाराला तेजी आली असली तरी बाजार निम्म्यानं घटलाय.. 


जीएसटी आणि नोटाबंदीने यंदाच्या दिवाळीत बाजारात नव्या मालाची कमतरता जाणवते आहे.. क्रयशक्ती कमी झाल्यानं गेल्या दशकातील दिवाळीच्या तुलनेत  या यंदा सोन्याची मागणीही फारच कमी झालीये... 


यंदा किरकोळ तसेच घाऊक बाजाराच्या तुलनेत सध्या ऑनलाइन शॉपिंगकडे ग्राहकांचा कल अधिक पहायला मिळाला. मात्र सोनेबाजारात आजही थेट खरेदीला पसंती जास्त आहे.. जीएसटी आणि नोटाबंदीनं सराफा बाजाराची लकाकी लुप्त झाली असली तरी अजून दोन ते तीन वर्षात हळूहळू सराफा बाजार तेजीत येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते.