GST on College Fee : 'झी 24 तास'वर शैक्षणिक क्षेत्रातली सर्वात मोठी बातमी. आता कॉलेजची फीसुद्धा जीएसटीच्या कक्षेत येणार का हा प्रश्न निर्माण झालाय. कारण आहे गडचिरोलीतल्या गोंडवाना विद्यापीठाचं परिपत्रक. विद्यापीठानं प्रकारच्या शैक्षणिक शुल्कांवर 18 टक्के कर आकारला आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात  नाराजीचा सूर आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशात नवी करप्रणाली लागू करताना शिक्षण क्षेत्राचा समावेश होणार नसल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र गोंडवाना विद्यापीठानं याबाबत एक परिपत्रक काढले आहे. सर्व संलग्नित कॉलेजेसना विविध शुल्क भरताना 18 टक्के जीएसटी भरावा लागणार असे आदेश दिलेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना मात्र मोठा भुर्दंड बसणार आहे. 


गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीने शिक्षणावरही जीएसटी लावल्याचे उघड झाले आहे. 3 एप्रिल रोजी विद्यापीठाच्या लेखा -वित्त विभागाने अधिनस्थ सर्वच महाविद्यालयांना हे परिपत्रक जारी केले आहे. ज्या ज्या बाबींवर विद्यापीठाला जीएसटी लागतोय त्या सर्व सेवांवर आता महाविद्यालयांना देखील जीएसटी द्यावा लागणार आहे. यात महाविद्यालय संलग्निकरणं, विद्यापीठ लेट फी आदींचा समावेश आहे. याचा अर्थ आता थेट विद्यार्थ्यांवर देखील जीएसटीचा भार पडणार असल्याचे उघड झाले आहे. 



जीएसटीमधून शिक्षण क्षेत्राला वेगळे ठेवण्याचा निर्णय असताना या नव्या परिपत्रकाने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. यापुढे विद्यापीठाने पत्रकार नेमून दिलेल्या यादीतील सर्व 9 बाबींवर महाविद्यालयांना अठरा टक्के जीएसटी भरावा लागणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे.