पालकमंत्र्यांचा दुष्काळी दौरा, शेतकऱ्यांनी मांडल्या व्यथा
पालकमंत्री एकनाथ शिंदेंनी दुष्काळी भागाचा दौऱ्या केला.
विशाल करोळे, औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील दुष्काळाची पाहणी कऱण्यासाठी उशीरा का होईना अखेर मंत्री दाखल झाले आहेत. पालकमंत्री एकनाथ शिंदेंनी दुष्काळी भागाचा दौऱ्या केला. दुष्काळात औरंगाबादमध्ये आणखी एक पथक पाहणीसाठी दाखल झालं. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या पथकाने दुष्काळाची पाहणी केली. दुष्काळग्रस्त भागात जाऊन त्यांनी दुष्काळग्रस्तांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांनीही आपल्या व्यथा मंत्र्यांसमोर मांडल्या.
यावेळी शेतकऱ्यांना नियमानुसार चारा मिळत नसल्याचं वास्तव समोर आलं. शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होतील असं आश्वासन यावेळी पालकमंत्र्यांनी दिलं. आचारसंहितेमुळे पथकामध्ये अधिकारी नव्हते. त्यामुळे सूचना नक्की कुणाला द्याव्या असा प्रश्नही पालकमंत्र्यांना पडला.
मराठवाड्याला पाहणी पथकं काही नवीन नाही. कधी केंद्राची, कधी राज्याची तर कधी मंत्र्यांची पथक दुष्काळग्रस्त भागात पाहायला मिळतात. मात्र यातून शेतकऱ्याच्या हाती काहीच लागत नाही. किमान आता गंभीर दुष्काळी परिस्थिती असताना तरी शेतकऱ्यांचे प्रश्न लवकर सुटावेत अशी माफक अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.