Maharashtra Weather Update : उन्हाळा सुरु झाला असता तरीही महाराष्ट्रासह देशभरात हवामानाबाबत कोणतीही शाश्वती दिली जात नाहीये. कारण, ऐन उन्हाळ्यामध्ये होणारा पाऊस आणि ढगांचा गडगडाट पाहता या पावसाचं काही खरं नाही, अशाच प्रतिक्रिया नागरिक देऊ लागले आहेत. सोमवारी मुंबईत निरभ्र आकाश असतानाच मंगळवारची सकाळ मात्र अवकाळी पावसाच्या जोरदार हजेरीमुळं ओलीचिंब झाली आणि हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार या पावसाचं सावट गुढी पाडव्याच्या दिवशीही राज्यावर आणि शोभायात्रांची धूम असणाऱ्या मुंबईवर असेल. (Gudi Padwa 2023 rain maharashtra weather updates latest Marathi news)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुढी पाडव्याच्या निमित्तानं हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाज पाहता घराबाहेर पडण्यापूर्वी पावसाची व्यवस्था करूनच निघा. मराठी नव वर्षाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यातील बहुतांश भागांणध्ये शोभायात्रा निघतात, यावेळी मराठी संस्कृतीचं दर्शन घडत असतं. पण, यंदा या उत्साही वातावरणावर पावसाचं सावट आहे. शहरातील काही भागांत हलक्या स्वरुपातील पावसाच्या सरी बरसू शकतात. तर, कोकण आणि विदर्भातील काही भागात ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकतं.


हेसुद्धा पाहा : Earthquake Effects : दिल्ली भूकंपानंतर अनेक ठिकाणी इमारती झुकल्या, अंगावर शहारे आणणारे VIDEO समोर


राज्यात पुढच्या 72 तासांमध्ये गारपीटीची शक्यता वर्तवण्यात आली असून यामुळं उत्तर महाराष्ट्र सर्वाधिक प्रभावित दिसू शकतो. तिथं दापोली, गुहागरमध्येही अवकाळीनं हजेरी लावल्यामुळं काजू आणि आंबा उत्पादकांपुढे नवं संकट उभं राहिलं आहे.


कधीपर्यंत बसणार अवकाळीचा तडाखा?


हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार श्रीलंकेपासून विदर्भापर्यंत 900 मीटरपर्यंत उंचच उंच कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. ज्यामुळं पुढील पाच दिवस राज्यातील काही भागांना अवकाळी पावसाचा तडाखा बसणार आहे.


देशभरातील हवामानाची काय परिस्थिती?


पश्चिमी झंझावात सक्रिय असल्यामुळं हवामानात लक्षणीय बदल पाहायला मिळतील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. आयएमडीनं वर्तवलेल्या अंदाजानुसार हिमालयाचं पश्चिम क्षेत्र, पंजाब, हरियाणा, दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, झारखंड या राज्यांमध्ये पावसासोबतच गारपीट होऊ शकते.


तर, छत्तीसगढ, ओडिशा, तेलंगणा, आंध्र प्रदेशचा किनारी भाग, तामिळनाडू, केरळचा किनारपट्टी भाग इथंही पावसाची हजेरी पाहायला मिळू शकते.