नागपूर : गुढीपाडव्याच्या पूर्व संध्येला नागपुरात महिलांची बाईक आणि स्कूटर रॅली काढण्यात आली. भारतीय  नववर्ष स्वागत समितीच्यावतीने काढण्यात आलेल्या या बाईक रॅलीत पारंपारीक वेशभूषेत असंख्य महिला सहभागी झाल्या होत्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुढीपाडव्याचे स्वागत मंगलमय वातावरणात करण्यासाठी या बाईक व स्कूटर रॅलीचे आयोजन करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले. महिलांच्या या बाईक रॅलीत मोठ्या प्रमाणात ई-रिक्षांचा देखील समावेश होता. ई रिक्षामध्ये बसून अनेक महिला व युवती नववर्ष स्वागताच्या या रॅलीत सहभागी झाल्या.