रत्नागिरी : गुहागर नगरपंचायत निवडणुकीत सत्ता परिवर्तन झाले आहे. भाजपने ६ जागांवर विजय मिळवलाय. तर शहर आघाडीला पाठिंबा दिलेल्या शिवसेनेला १ जागा मिळालेय. तर शहर आघाडीकडे ९ जागा आल्यात. त्यामुळे गुहागर नगरपंचायतीमध्ये शिवसेनेच्या पाठिंब्यावर शहर आघाडीची सत्ता असणार आहे. माजी पंचायत समिती सभापती राजेश बेंडल आणि गुहागरमधील नागरिक यांनी स्थापन केलेली आघाडी यामध्ये आमदार भास्कर जाधव किंबहुना राष्ट्रवादीने दुखावलेले सगळे एकत्र आले. त्यांनी सत्ता आपल्याकडे खेचून आणली.


भास्कर जाधवांना दणका


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विद्यमान राष्ट्रवादीचे आमदार भास्कर जाधव यांना शिवसेने जोरदार दे धक्का दिलाय. जाधव यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर राष्ट्रवादीत दाखल झालेत. आधी ते चिपळूणचे आमदार होते. त्यानंतर त्यांनी गुहागर विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढविली. ते आमदार झालेत. त्यांच्या आमदारकीच्या काळात गुहागर नगरपंचायत अस्तित्वात आली. त्यानंतर या नगरपंचायतीवर राष्ट्रवादीचे वर्चस्व होते. मात्र, शिवसेने आमदार भास्कर जाधव यांना दणका देण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली. त्यांनी राष्ट्रवादीच्या नाराज गटाला हाताशी धरुन निवडणुकीच रणनीती आखली त्यात ते यशस्वी झालेत.


माजी पंचायत समिती सभापती राजेश बेंडल आणि गुहागरमधील नागरिक यांनी स्थापन केलेली आघाडी यामध्ये आमदार भास्कर जाधव किंबहुना राष्ट्रवादीने दुखावलेले सगळे एकत्र आले. त्यांनी जाधव यांना जोरदार दणका देण्याचा निश्चिय केला. त्याला शिवसेनेकडून अधिक पाठबळ मिळाले. शिवसेनेने या शहर आघाडीला पाठिंबा दिला. त्यामुळे गुहागर निवडणुकीत जाधव यांना पराभवाचा धक्का बसलाय. केवळ राष्ट्रवादीचा अधिकृत एकच उमेदवार निवडून आलाय.  


गुहागर -निवडणुकीतील विजयी उमेदवार  


प्रभाग 1 - सुजाता बागकर -राष्ट्रवादी
प्रभाग २ - उमेश भोसले - भाजप
प्रभाग 3 -  मनाली सांगळे - शहर विकास आघाडी
प्रभाग 4 - नेहा सांगळे - शहर विकास आघाडी
प्रभाग 5 - समीर घाणेकर - भाजप
प्रभाग 6 - गजानन वेल्हाळ -भाजप
प्रभाग 7 - नीलिमा गुरव - सेना
प्रभाग 8 - अरुण रहाटे - भाजप
प्रभाग 9 - वैशाली मालप - शहर विकास
प्रभाग 10- प्रसाद बोले - शहर विकास
प्रभाग 11- स्नेहा भागडे - शहर विकास
प्रभाग 12-  भाग्यलक्ष्मी कानडे - भाजप
प्रभाग १३ - माधव साटले - शहर विकास
प्रभाग 14 -  प्रणित साटले - शहर विकास
प्रभाग 15 - स्नेहल देवाळे - शहर विकास
प्रभाग 16 - अमोल गोयथळे - शहर विकास
प्रभाग 17-  मृणाल गोयथळे (भाजप)