Sanjay Raut in Jalgaon : शिवसेनेत मोठी फूट पडल्यानंतर ठाकरे गटाकडून राज्यात दौरे करण्यात येत आहे. तसेच सभांचे आयोजन करण्यात आले आहे. जळगवा येथे ठाकरे गटाची सभा होणार आहे. या सभेचा आढावा घेण्यासाठी खासदार संजय राऊत जळगावात पोहोचले आहे. यावेळी त्यांना काळे झेंडे दाखवणाऱ्या मंत्री गुलाबराव पाटील यांच्या कार्यकर्त्यांना जळगाव शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गुलाबराव पाटील यांचे चिरंजीव प्रताप पाटील यांनी प्रशासनाला इशारा दिला आहे. पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशन गाठले.


उद्धव ठाकरे यांची जळगाव येथे सभा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

माजी मुख्यमंत्री आणि पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची जळगाव येथे सभा होणार आहे. (Uddhav Thackeray Sabha in Jalgaon) या सभेच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत हे जळगावमध्ये दाखल झाले आहेत. दरम्यान संजय राऊत यांना गुलाबराव पाटील यांच्या कार्यकर्त्यांकडून काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला. दरम्यान, झेंडे दाखवण्याचा प्रयत्न करणाऱ्या कार्यकर्त्यांना शहर पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळताच मंत्री गुलाबराव पाटील यांचे पुत्र प्रताप पाटील जळगाव शहर पोलीस स्टेशनला दाखल झाले. पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले अन्यथा जळगाव आणि गुलाबराव पाटील काय आहेत हे संजय राऊत यांना दाखवून दिले असते, असे प्रताप पाटील म्हणाले.


संजय राऊत यांचे जोरदार स्वागत 


 आमच्या कार्यकर्त्यांच्या जोरावर पाचोर्‍याच्या सभेत काय होणार हे प्रशासनाने बघावं, असा थेट इशारा प्रताप पाटील यांनी दिला आहे. दरम्यान, खासदार संजय राऊत जळगाव जिल्हा दौऱ्यावर आहेत. राजधानी एक्स्प्रेसने राऊत यांचे जळगाव रेल्वे स्थानकावर आगमन झाले. यावेळी जळगाव रेल्वे स्थानकावर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांच्यावतीने त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.



ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी राऊत यांचे रेल्वे स्थानकावर ढोल ताशांच्या गजरात जल्लोषात स्वागत करण्यात आले. रविवारी उद्धव ठाकरे यांची पाचोरा येथे जाहीर सभा होणार आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत हे जळगाव येथे दाखल झाले आहेत. दरम्यान, गुलाबराव पाटील यांनी ठाकरे गटावर आणि राऊत यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर राऊत यांनी गुलाबराव पाटील यांना सभेत घुसून दाखवा आणि तुम्ही परत जाऊन दाखवा, असे आव्हान दिले होते. त्यामुळे जळगावच्या सभेकडे लक्ष लागले आहे.