Manoj Jarange Patil Vs Gunratna Sadavarte : मराठा समाजाबद्दल अपशब्द वापरल्याप्रकरणी  गुणरत्न सदावर्तेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. सदावर्तेंवर गुन्हा दाखल करुन अटक करण्याची  मागमी धाराशिवच्या कळंब पोलीस स्टेशनमध्ये सकल मराठा समाजाच्यावतीने करण्यात आलीय. मनोज जरांगेची 'सभा नव्हे जत्रा' आहे असं वक्तव्य सदावर्तेनी केलं होतं. त्यामुळे मराठा समाज आक्रमक झालं असून सदावर्तेंवर कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सकल मराठा समाजाच्यावतीने देण्यात आला आहे.


छगन भुजबळ आणि गुणरत्न सदावर्ते यांना मराठ्यांना उचकवायला सांगितल्याचा मनोज जरांगेचा आरोप  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

छगन भुजबळ आणि गुणरत्न सदावर्ते यांना मराठ्यांना उचकवायला सांगितल्याचा सर्वात मोठा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच अजित पवार यांनी उचकवायला सांगितल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी केला आहे.  


मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर गुणरत्न सदावर्ते यांची टीका  


मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंची स्टंटबाजी सुरू असल्याची टीका गुणरत्न सदावर्ते यांनी केलीय. जरांगे पाटलांच्या माध्यमातून 14 ऑक्टोबरपासून महाराष्ट्र पेटवण्याचा घाट घातला जातोय त्यामुळे जरांगे पाटलांना अटक करण्याची मागणी त्यांनी केली होती. तर, गुणरत्न सदावर्ते हे मराठाद्वेषी असून मराठा आरक्षणात विष कालवण्याचं काम करत असल्याचा  पलटवार मनोज जरांगे यांनी केला होता.


वकिल गुणरत्न सदावर्तेंविरोधात मराठा समाज आक्रमक 


वकिल गुणरत्न सदावर्तेंविरोधात मराठा समाज आक्रमक झाला होता. जालन्यात टायर जाळून मराठा आंदोलकांनी सदावर्तेंचा निषेध केलाय. मराठा समाजाच्या भावना दुखावल्याप्रकरणी सदावर्तेंवर गुन्हा दाखल करा अशी मागणी मराठा आंदोलकांनी केलीय. भोकरदन तालुक्यातील हसनाबाद फाट्यावर मराठा कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. मनोज जरांगेंची अंतरवाली सराटीतली सभा म्हणजे जत्रा होती असं वक्तव्य गुणरत्न सदावर्ते यांनी केलं होतं. याच विधानावरून मराठा समाजानं आक्रमक भूमिका घेतली. 


गुणरत्न सदावर्तेंची राज ठाकरेंवर टीका


टोलदरवाढीवरुन मनसेनं केलेल्या आंदोलनावरुन गुणरत्न सदावर्तेंनी राज ठाकरेंवर टीका केलीये.. राज ठाकरेंचं चरित्र बकवास आहे.. ते केवळ वैयक्तित स्वार्थासाठी आंदोलनं करतात असा आरोप सदावर्तेंनी केलाय.. सामान्य माणसांना वेठीस धरु नका संविधानिक मागणी करा असा सल्ला त्यांनी राज ठाकरेंना दिलाय.