शिर्डी : शिर्डीत गुरूपौर्णिमा उत्सवास भक्तीमय वातावरणात सुरूवात झालीय. साईनामाचा जयघोष करत पालख्या शिर्डीत दाखल झाल्यात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज सकाळच्या काकड आरतीनंतर साई मंदिरापासुन साईंची प्रतीमा, वीणा आणि साई चरीत्र ग्रंथांची मिरवणूक काढण्यात आली. व्दारकामाईत अखंड पारायणाच वाचन करुन गुरुपोर्णिमा उत्सवाला सुरुवात झालीय.


उत्सवानिमित्त साई मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आलीय. गुरु पोर्णिमा उत्सवाच्या निमित्तानं साई मंदिर परीसर आणि गर्भगृहास फुलांची आकर्षक सजावट करण्यात आलीय. 


साई चरित्राचा पहिला अध्याय साई संस्थानचे उप अध्यक्ष चंद्रशेखर कदम यांनी पठण केला. त्यानंतर इतर भाविक साईच्या चरीत्रास अखंड पठण करणार असून उद्या सकाळी या पठणाची सांगता केली जाणार आहे. 


शिर्डीत गुरुपोर्णिमाउत्सव तीन दिवस साजरा केला जातो. दरम्यान शिर्डीत मोठ्या उत्साहात गुरुपौर्णिमा उत्सवाला सुरुवात झाली असताना एका साई भक्त परिवारानं साईचरणी दोन किलो वजनाच्या सोन्याच्या पादूका अर्पण केल्यात. द्वारकामाई मंदिरातील साईबाबांच्या फोटोसमोर या पादुका बसवण्यात येणार आहेत.