H3N2 influenza : महाराष्ट्रात H3N2 विषाणूचा (H3N2 Virus) धोका वेगाने वाढताना दिसतोय. गेल्या 7 दिवसांपासून H3N2 व्हायरसच्या रुग्णांची (patients) संख्या वेगाने वाढताना दिसत आहे. त्यामुळे आता आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आल्याचं पहायला मिळतंय. त्यामुळे आता आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Health Minister Tanaji Sawant) यांनी राज्यातील नागरिकांना महत्त्वाचं आवाहन केलंय. 


काय म्हणाले Tanaji Sawant?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी नागरिकांना ताप अंगावर न काढण्याची सूचना दिली आहे. त्याचबरोबर घाबरून न जाण्याचं आवाहन देखील त्यांनी केलंय. H3N2 मुळे लगेच मृत्यू (H3N2 Death) होत नाही, उपचार घेतला तर तो रुग्ण बरा होतो, असं म्हणत त्यांनी नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.


आरोग्य विभागाने सर्वांना अलर्ट जारी केला आहे.  H3N2 लक्षण असलेल्या आजाराचा रुग्ण असेल तर त्याच्यावर उपचार करण्याचे निर्देश दिलेले आहेत.  तुम्हाला किंवा घरातल्या व्यक्तीला ताप येत असेल, तर आजार अंगावर काढू नका. तात्काळ डॉक्टरचा सल्ला घ्या, असंही तानाजी सावंत यावेळी म्हणाले आहेत.


आणखी वाचा  - महाराष्ट्रात दोन H3N2 संशयित रुग्णांचा मृत्यू, देशात मृत्यूचा आकडा वाढतोय


12 मार्चपर्यंत राज्यात 352 रुग्ण आहेत, असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली आहे. H3N2 मुळे काही मृत्यू झाले आहेत. त्याचा दाखला देखील त्यांनी दिला आहे.



H3N2 ची लक्षणं (H3N2 symptoms)


1. ताप येणे किंवा ताप येणे.
2 .खोकला
3. घसा खवखवणे.
4. वाहणारे किंवा भरलेले नाक.
5 .स्नायू किंवा शरीरात वेदना.
6 .डोकेदुखी
7. थकवा
8. उलट्या आणि अतिसार (प्रौढांपेक्षा मुलांमध्ये अधिक सामान्य)