H3N2 Influenza: तुम्हाला सर्दी, खोकला, ताप किंवा कोरोनासंबंधी कोणतंही लक्षण (H3N2 Influenza Signs) जाणवत असेल तर अजिबात दुर्लक्ष करु नका. कारण देशासह महाराष्ट्रात H3N2 चं संकट (H3N2 Virus) वाढतंय. H3N2मुळे देशात आतापर्यंत 3 मृत्यू झालेत तर महाराष्ट्राच्याही मोठ्या शहरांमध्ये H3N2 चा फैलाव वाढायला लागलाय. केंद्रानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात गेल्या आठवड्यात 170 रुग्ण आढळले होते. मुंबई, ठाणे आणि पुण्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आल्याची माहिती आरोग्यमंत्री तानाजी सावंतांनी (Tanaji Sawant) दिली होती. आत्तापर्यंत पुण्यात तब्बल 26 रुग्ण आढळून आल्याने पुणेकरांचं (Pune News) टेन्शन वाढलंय.


वयोगटानुसार पुण्यातील रुग्णसंख्या (H3N2 Virus in Pune)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शून्य ते 5 वयोगटात एकही रुग्ण आढलला नाही. तर 6 ते 18  वयोगटात 5 रुग्ण आढलले आहेत. त्याचबरोबर 19 ते 60 गटातील रुग्णसंख्या 13 वर पोहोचली आहे. 60 वयांपेक्षा अधिक वयोगटात 4 रुग्ण आढलेत. त्यामुळे पुण्यातील रुग्णसंख्या (H3N2 patients in Pune) आता 22 वर पोहोचली आहे.


H3N2 चा महाराष्ट्रात कहर


पुण्याप्रमाणेच छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) आणि नाशिकमध्ये (Nashik) H3N2 चे रुग्ण वाढतायत. पुण्यासह छत्रपती संभाजीनगरमध्ये 11 रुग्ण तर नाशकात 3 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. (H3N2 virus is wreaking havoc in Maharashtra after Pune patients are increasing Chhatrapati Sambhajinagar and Nashik)


तज्ज्ञ काय म्हणतात?


एन्फ्लूएन्झा ए विषाणूचा (H3N2 Influenza A) उपप्रकार असलेल्या H3N2 व्हायरसनं महाराष्ट्रात हातपाय पसरायला सुरुवात केलीय. 2020 मध्ये मार्च महिन्यातच कोरोनाचा (Corona) धुमाकूळ सुरु झाला होता. आताही मार्च महिन्यातच H3N2 चा फैलाव सुरु झालाय. कोरोनासारखा या व्हायरसचा रुग्णवाढीचा वेग नाही. तरीही पुरेशी काळजी घेणं आवश्यक आहे, अशी माहिती पुणे महानगरपालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ भगवान पवार (Dr Bhagwan Pawar) यांनी दिली आहे.


H3N2 ची लक्षणं काय? (Symptoms Of H3N2)


खोकला, नाक वाहणे... इतकंच नाही तर उच्च ताप येणे, अंग दुखणं, सतत मळमळ, उलट्या किंवा जुलाब होणे, ही लक्षणं H3N2 ची  आहेत. त्यामुळे ही लक्षणं दिसताच लगेच डॉक्टरांना दाखवणं गरजेचं आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतीही औषधं घेऊ नये, असा सल्ला देखील तज्ज्ञांनी दिला आहे.