गोंदियात चौथ्या दिवशीही गारपीट, अनेक ठिकाणी गारांचे थर
सलग चौथ्या दिवशीही गारपीट सुरु आहे. गोंदिया जिल्ह्यातल्या गोरेगांव तालुक्यात मंगळवारी रात्री गाराचा पाऊस पडला.
गोंदिया : सलग चौथ्या दिवशीही गारपीट सुरु आहे. गोंदिया जिल्ह्यातल्या गोरेगांव तालुक्यात मंगळवारी रात्री गाराचा पाऊस पडला.
गारांचे थर
तालुक्यातील कुराडी, खाडीपार, मंगेझरी या गावात ही गारपीट झाली. अनेक ठिकाणी अजूनही गारांचे थर जमा आहेत. या गारपिटीमुळे गावातील अनेक घरांचं नुकसान झालं. तर सध्यास्थितीत शेतात पिक जरी नसलं तरीही बाहेर ठेवलेल्या धान्याचं नुकसान झालं आहे.
अनेक जनावरे जखमी
सोबतच या गारपीटीचा फटका इथल्या जनावरांना देखील बसला असून अनेक जनावरे जखमी झाली आहे. विदर्भात 48 तासांत पुन्हा गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. काल दिवसभर जिल्ह्यात ढगाळ वातावरण असल्यानं शेतकऱ्यांनी आपला माल सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे प्रयत्न सुरू केले. मात्र अचानक आलेल्या गारपिटीमुळे बळीराजाला पुन्हा तडाखा बसला.
पाहा काय आहे स्थिती