मुंबई : राज्यात पुन्हा एकदा गारपिटीचा इशारा देण्यात आलाय. विदर्भासह मध्य महाराष्ट्रात ७ आणि ८ मार्चला गारपिटीचा इशारा हवामान खात्यानं दिलाय. 


कुठे बसेल तडाखा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बुधवारी मध्य महाराष्ट्रात वादळी वा-यासह गारपीट होईल. तर गुरूवारी विदर्भात विजांच्या गडगडाटासह गारपिटीचा तडाखा बसेल असा अंदाज वेधशाळेनं वर्तवलाय. गारपिटीच्या इशा-याच्या पार्श्वभूमीवर शेतक-यांनी काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आलंय. 


राज्यात गरमीची लाट


राज्यात पारा चांगलाच वाढला आहे. भीरा या गावातील तापमान पारा ४० अंश सेल्सिअस नोंद झाली तर अकोला, जळगांव, नंदुरबार या भागांत पारा ३८ अंश सेल्सिअस वर गेला. येत्या दोन तीन दिवसात पारा सरासरी पेक्षा जास्त राहील असा अंदाज कुलाबा वेधशाळेन वर्तविला आहे.