यवतमाळ : पाकिस्तानने केलेल्या भ्याड हल्ल्याचे चोख आणि जबरदस्त उत्तर दिले जाईल. आम्ही पाकिस्तानला सोडणार नाही असा इशारा केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी दिला. 


यवतमाळच्या घारफळ येथे एका कार्यक्रमात ते बोलत होते. कुरापती पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन होते अशावेळी त्याला उत्तर दिलं जाईल. हाफीज सईदची मदत घेऊन पाकिस्तान छुपे हल्ले करतोय त्याला वेळीच उत्तर दिलं जाईल, असं अहिर यांनी सांगितलं.