अखेर तोडगा, नाशिक हनुमानाचे जन्मस्थान असल्याचे मान्य
Lord Hanuman’s birthplace : हनुमान जन्मस्थानावरुन साधुंमध्ये मोठा वाद निर्माण झाला होता. अखेर हनुमान जन्मस्थानावर सहमतीनेच तोडगा निघाला.
योगेश खरे / नाशिक : Lord Hanuman’s birthplace : हनुमान जन्मस्थानावरुन साधुंमध्ये मोठा वाद निर्माण झाला होता. अखेर हनुमान जन्मस्थानावर सहमतीनेच तोडगा निघाला. नाशिक हेच हनुमानाचे जन्मस्थान असल्याचे मान्य करण्यात आले आहे. अयोध्या रामजन्मभूमी न्यासाचे गंगाधर पाठक यांनी हे मान्य केले. शास्त्रार्थ चर्चेतील वादातून बाहेर आलेला निष्कर्श जाहीर करण्यात आला. त्यात नाशिक हेच हनुमानाचे जन्मस्थान असल्याचे मान्य केले गेले. गोविंदानंद यांनी आता हनुमान जन्मस्थानाचा आग्रह सोडावा, असे पाठक यांनी म्हटले आहे.
दरम्यान, हनुमान जन्मस्थानाबाबत पुराणात सुद्धा मतभेद आहेत. तुलसीदास यांनी सांगितलंय, हा कल्पभेद आहे. वर्तमान कल्पमध्ये जितके रामायण आहेत (दोनशे अडीचशे) किमान आहेत. रामायणमीमांसानुसारमध्ये सुद्धा यावर चर्चा सुरु आहे. रामजन्म भूमी प्रमाणे हनुमान जन्म भूमीचा वाद दूर व्हावा असा गोविंदानंद यांचा आग्रह होता. गोविदनंद हे अभ्यासक आहेत, ते फर्जी नाहीत. किष्किंधा हेच हनुमान जन्म स्थळ व्हावे आणि संभ्रम दूर व्हावा, असे म्हटले. दरम्यान, ब्रम्हपुराणात हनुमानाचा जन्म अंजनेरीत झाला आहे हे मान्य.
किष्किंधा मध्ये हनुमान जन्मस्थळ आहे यावर माझा ठाम विश्वास आहे. मात्र तिरुपतीत पण हा दावा करण्यात आला. तिरुपतीत हा दावा खोटा ठरविला गेला. आंध्रात तर हनुमानाचे लग्न केले, अशी आध्यत्मिक भेसळ नको, असे मत पुढे आले. अभ्यासक म्हणून हनुमान यांचा असली इतिहास समोर यायला हवा. खरे काय समोर येणे हे महत्वाचे, यावर चर्चा झाली.
वाल्मिकी रामयनानुसार किष्किंधा हेच जन्मस्थळ आहे. जन्माचा वृत्तांत चार ठिकाणी येतो. साक्षात हनुमानाने श्रीलंकेत सीतेसमोर आपली ओळख संगताताना आपली जन्मकथा सांगतात.अगस्ती महाऋषींनी हनुमानाच्या उपस्थितीत भगवान रामासमोर हनुमानाच्या जन्माची कथा सांगितली. किष्किंधामध्ये हनुमान जन्मस्थळ आहे, यावर विश्वास करण्यात आला.
दरम्यान, केंद्र सरकार आणि तत्सम विभागाने हनुमान जन्म कुठे झाला या वादात पडण्यास नकार दिला आहे. गोविंदानंद यांना अंजनेरीत जन्म झाल्याचे अजूनही मान्य नाही, ते शंकराचार्य ठरवितील असे सांगत मान्य करण्यास नकार दिला आहे. अंजनेरीत ब्रम्हपुराणात जन्म झाला असेल तर आई कोण वडील कोण तिथी काय हे सर्व सिद्ध झाले पाहिजे, असा गोविंदानंद यांचा सवाल आहे.