विवाहितेचा सासरच्यांकडून पैशांसाठी छळ आणि मारहाण, व्हिडिओ व्हायरल
woman Harassment and beating in Osmanabad : विवाहितेबाबत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. माहेरहून पैसे आणण्याचा तगादा लावत तिला जोरदार मारहाण करण्यात आली.
उस्मानाबाद : woman Harassment and beating in Osmanabad : विवाहितेबाबत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. माहेरहून पैसे आणण्याचा तगादा लावत तिला जोरदार मारहाण करण्यात आली. उस्मानाबादच्या ढोकी तालुक्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका विवाहितेला सासरच्यांकडून पैशांसाठी छळ होत असल्याचे समोर आले आहे. विवाहितेला सासरचे मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला असून, याबाबतची तक्रार पोलिसांत देण्यात आली आहे.(Harassment and beating of married woman by her father-in-law for money)
माहेरहून पैसे आणण्यासाठी पतीसह सासरच्यांनी तगादा लावल्याचा आरोप पीडितेने केला आहे. तर चारित्र्यावर संशय घेऊन सासऱ्याने हाताला चावाही घेतल्याचा आरोप पीडित विवाहितेने केला आहे. पीडितेने ढोकी पोलिसात मारहाणीची तक्रार दाखल केली आहे.
तिला होत असलेली मारहाण इतकी अमानुष आहे की व्हिडिओ पाहताना अंगावर काटा येतो. पीडितेचा पती संतोष थोरात याच्यासह सासरे बाळासाहेब थोरात, सासू आणि नातेवाईकांची तक्रार पोलिसात करण्यात आली आहे.