मुंबई : मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत होण्याची जणू स्पर्धाच लागलेली दिसत आहे. आता हार्बरची सेवा खंडीत आहे. जुईनगर येथे लोकलमध्ये बिघाड झाल्याने पनवेल ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) वाहतूक ठप्प आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल झालेत. आधीच गाड्या लेट असतात आणि त्यात हा खोळंबा झाल्याने विकएंडला प्रवासी त्रस्त आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉग, जम्बोब्लॉक घेऊनही या मार्गाचं विघ्न दूर होताना दिसत नाही. याच आठवड्यात मंगळवारी हार्बर रेल्वेची वाहतूक तब्बल साडेपाच तास विस्कळीत झाली होती. वडाळ्याहून पनवेलला जाणाऱ्या लोकलचा पेंटाग्राफ ओव्हरहेड वायरमध्ये अकडल्यानं वाहतुकीचे तीनतेरा वाजले होते.


आज दुपारी पनवेल-सीएसएमटी लोकल सेवा बंद पडली. 'डाउन' मार्गावरील वाहतूक सुरू आहे. जुईनगरजवळ झालेला तांत्रिक बिघाड तातडीने दुरुस्त करण्यात येत आहे. मात्र, हा बिघाड दूर झालेला नाही. त्यामुळे मुंबईकडे येणाऱ्या गाड्यांचं वेळापत्रकही कोलमडे आहे. त्यामुळे  पनवेलकडे जाणाऱ्या गाड्यांची हीच स्थिती होण्याची भिती व्यक्त होत आहे.