अलिबाग : गुजरातमधील पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी धनगर आरक्षणापाठोपाठ मराठा आरक्षणाच्या मागणीलाही पाठिंबा जाहीर केलाय. रायगडमध्ये सुरू असलेल्या संभाजी ब्रिगेडच्या ९ व्या राज्यस्तरीय अधिवेशनात ते बोलत होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


मराठा समाज आरक्षणाची मागणी का करतोय, हे समजून घेतलं पाहिजे. जेव्हा मराठा समाजानं शांततेत ५२ मोर्चे काढले तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस डमरू वाजवत होते का, असा सवाल करतानाच भीमा कोरेगावच्या निमित्तानं मराठा विरूद्ध दलित वाद रंगवला जातोय, याकडं पटेल यांनी लक्ष वेधलं. 


मोदी सरकारच्या कारभारावरही त्यांनी जळजळीत टीका केली. दहा दिवसांपूर्वी धनगर समाजाच्या मेळाव्यात हार्दिक पटेल यांनी आवर्जून हजेरी लावली होती. आता संभाजी ब्रिगेडच्या व्यासपीठावर हजेरी लावून त्यांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा दिलाय.