शिवसेनेसोबत आता संबंध नाही : आमदार हर्षवर्धन जाधव
शिवसेनेसोबत आता संबंध नसल्याचे जाहीर करत शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव लवकरच नवा पक्ष काढणार आहेत.
औरंगाबाद : मराठा आरक्षणासाठी राजीनामा देणारे शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव लवकरच नवा पक्ष काढणार आहे, त्यांनी औरंगाबादमध्ये त्याची घोषणा केली आणि शिवसेनेसोबत आता संबंध नसल्याचंही त्यांनी जाहीर केलंय.
सामाजिक समरसतेसाठी मराठा समाजासह 18 पगड जातींच्या प्रतिनिधींची त्यांनी आज बैठक घेतली आणि त्यानंतर सामाजिक समता निर्माण कऱण्यासाठी नवा पक्ष काढणार असल्याचं त्यांनी सांगितले. येत्या दीड महिन्यात हा नवा पक्ष स्थापन होणार आहे. मराठा, धनगर आणि मुस्लिम समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, अशी भूमिका यावेळी जाधव यांनी मांडली.