Hasan Mushrif :  राष्ट्रवादीचे वजनदार नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांना हायकोर्टाचा मोठा दिलासा दिला आहे. दोन आठवड्यांसाठी हा दिलासा दिला आहे. ईडीच्या ( ED) धाडीनंतर काल मुश्रीफ यांनी दाखल एक याचिका दाखल केली होती. दरम्यान, हसन मुश्रीफ आजच ईडीसमोर हजर राहणार आहेत. शनिवारी कोल्हापूर येथील त्यांच्या घराची ईडीच्या अधिकाऱ्यांनी छाडाछडती घेतली होती. त्यानंतर त्यांना ईडीने समन्स बजवाले होते. त्यामुळे त्यांनी अटक होण्याची शक्यता व्यक्त होत होती. मात्र, मुश्रीफ यांनी आता अटकपूर्व जामीन मिळवला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर झालेल्या ईडीच्या छापेमारीनंतर तब्बल तीन तासांहून अधिक काळापासून मुश्रीफ हे नॉट रिचेबल होते. याबाबत उलटसुलट चर्चो सुरु होती.  मुश्रीफ यांना काल ईडी कार्यालयात हजर राहण्यासाठी समन्सही बजावण्यात आले होते. मात्र, त्यांचे वकील हे ईडी कोर्टात उपस्थित होते. हसन मुश्रीफ आपल्या वकिलांसोबत मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. हसन मुश्रीफ आज मुंबईतील ईडीसमोर चार वाजता हजर होणार आहेत. हायकोर्टाने दिलासा दिल्यानंतर आजच ते ईडीसमोर जाणार आहेत. ईडीने समन्सद्वारे काल हजर राहण्यास सांगितले होते. परंतु काल ते हजर राहिले नव्हते. दरम्यान, अनिल देशमुख यांच्या प्रकरणापासून धडा घेतल्याचं दिसतंय.. कारण देशमुखांना ईडीने चौकशीसाठी बोलावल्यानंतर अटक केली होती. मात्र आता अटकेपासून दिलासा मिळाल्यानं मुश्रीफ चौकशीसाठी हजर होणार आहेत. 


हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील निवासस्थानी शनिवारी ईडीने दुसऱ्यांदा छापेमारी केली. यामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झालेले पाहायला मिळाले होते. यावेळी भाजप आणि ईडीविरोधात कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा केल्या. ईडीने मुश्रीफ यांच्या घरी जेव्हा छापा टाकला त्यावेळी ते घरामध्ये नव्हते. तब्बल साडेनऊ तास घराची झाडाझडती घेत ईडी अधिकाऱ्यांनी चौकशी करत काही कागदपत्रं तपासली. संध्याकाळी ते घरातून बाहेर पडले. दरम्यान, दुसऱ्या दिवशी मुश्रीफ हे कागल येथे आपल्या घरी घेले होते. त्यांनी कोर्टात धाव घेत अटकपूर्व जामीन मिळवला आहे. त्यामुळे आता ईडीला त्यांना किमान दोन आठवडे तरी अटक करता येणार नाही.


तर दुसरीकडे आमदार अनिल परब यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. दापोली इथल्या रिसॉर्टशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीनं त्यांच्याविरुद्ध नोंदवलेला ECIR रद्द करण्याची मागणी परबांनी केलीय. याप्रकरणाची सुनावणी तातडीनं करण्याची विनंती परबांनी केली होती, त्यानुसार आज खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे.