मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं अक्षर तुम्ही पाहिलत का?अनेकदा पहाल `हा` एकच व्हिडीओ
अभिनेता प्रसाद ओकचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खूप जवळचे संबध आहेत. धर्मवीर या सिनेमामध्ये प्रसादने धर्मवीर आनंद दिघे यांची भूमिका साकारली होती. या सिनेमात दिघे साहेबांचं आणि एकनाथ शिंदे यांच्या मैत्रीचे संबध खूप सुंदररित्या दाखवण्यात आले आहेत. या सिनेमात प्रसाद ओकने केलेल्या अभिनयाचं अनेकदा एकनाथ शिंदे यांनी कौतुकही केलं आहे.
मुंबई : अभिनेता प्रसाद ओकचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खूप जवळचे संबध आहेत. धर्मवीर या सिनेमामध्ये प्रसादने धर्मवीर आनंद दिघे यांची भूमिका साकारली होती. या सिनेमात दिघे साहेबांचं आणि एकनाथ शिंदे यांच्या मैत्रीचे संबध खूप सुंदररित्या दाखवण्यात आले आहेत. या सिनेमात प्रसाद ओकने केलेल्या अभिनयाचं अनेकदा एकनाथ शिंदे यांनी कौतुकही केलं आहे. लवकरच 'धर्मवीर २' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपुर्वी प्रसादने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत गृहप्रवेशाचे फोटो शेअर केले होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली होती.
एक पोस्ट शेअर करत प्रसादने कॅप्शनमध्ये लिहीलं आहे की, मुख्यमंत्री साहेब…!!!माझ्यासारख्या एका छोट्या कलाकाराच्या विनंतीला मान देवून…तुम्ही दिलेला शब्द पाळलात आणि वास्तू शांतीच्या दिवशी आमच्या घरी आलात. अत्यंत व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून आलात. कोणताही राजकारणी अविर्भाव न ठेवता अगदी कुटुंबातलेच असल्याप्रमाणे आमच्या सोबत बसलात,जेवलात..नीट निरखून आख्खं घर पाहिलंत.. हा प्रसंग आमच्या सगळ्यांच्या मनावर कायमचा कोरला गेला आहे. आपले गुरु धर्मवीर आनंद दिघे साहेब, यांच्या पावलावर पाऊल टाकत आपण ज्या पद्धतीनी “माणूस” जोडता आहात ते पाहता “गुरुने दिला ज्ञानरुपी वसा…आम्ही चालवू हा पुढे वारसा” हे शब्द तंतोतंत खरे करताय असंच वाटलं..!!साहेब…मनःपुर्वक आभार…!!! ओक कुटुंबीय.
प्रसादची ही पोस्ट पाहून अनेकांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. या पोस्टमध्ये त्याने अनेक फोटो शेअर केले आहेत शेअर केलेल्या पहिल्या फोटोत एकनाथ शिंदे कारमधून हात दाखवताना दिसत आहेत तर दुसऱ्या फोटोत प्रसाद ओक आणि एकनाथ शिंदेसोबत गप्पा मारताना दिसत आहेत. तिसऱ्या फोटोत एकनाथ शिंदे प्रसाद ओकच्या कुटूंबाला पुष्पगुच्छ देत शुभेच्छा देताना दिसत आहेत. तर पुढच्या फोटोत एकनाथ शिंदे ओक कुटूंबासोबत फोटोसाठी पोज देताना दिसत आहे. मात्र सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं ते म्हणजे या सोबत शेअर केलेल्या त्या व्हिडीओची. प्रसादने या सोबतच शेवटी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रसादच्या घराच्या भिंतीवर काहीतरी लिहीताना दिसत आहेत.
समोर आलेल्या या व्हिडीओमध्ये मुख्यमंत्री प्रसाद ओकच्या घराच्या भिंतीवर लिहीत आहेत, 'हार्दिक शुभेच्छा' याचबरोबर त्यांनी यापुढे त्यांची सही देखील केली आहे. ६ जानेवारीला गृहप्रवेशाचा हा कार्यक्रम पार पडला. सध्या प्रसादच्या या पोस्टची चर्चा मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे.