Maharashtra Rain Updates: राज्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळतोय. यामुळे काही दुर्देवी घटना घडल्या आहेत. रायगडच्या इरसालवाडी गावावर दरड कोसळलीय (Irshawadi Landslide).या दुर्घटनेत 10 जणांचा मृत्यू झालाय. इरसालवाडी गावात 48 कुटुंब राहत असून, 228 लोक इथे राहतात.. यातील 25 ते 28 कुटुंब बाधित झालीयत. ढिगाऱ्याखाली 70 जण अडकल्याची भीती आहे. या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), रायगडचे पालकमंत्री उदय सामंत, मंत्री दादा भुसे, गिरीष महाजन घटनास्थळी उपस्थित आहेत. जुन्या मुंबई पुणे महामार्गालगत (Mumbai-Pune Highway) हे गाव आहे. एनडीआरएफ, टीडीआरएफच्या पथकाकडून बचावकार्य (Resque) सुरू आहे. मदतीसाठी अनेक रेस्क्यू टीमकडून बचावकार्य केलं जातंय. मात्र, पावसामुळे बचावकार्यात अडथळा येतोय...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पिंपरीत रस्ता खचला
पिंपरी चिंचवड (Pimpri-Chichwad) मध्ये गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे रस्ता खचण्याची घटना घडलीय. पिंपळे सौदागरच्या उच्चभ्रू भागातील कुणाल आयकॉन रोडवर रस्ता खचण्याची ही घटना घडली. सुदैवानं या ठिकाणी कोणतीही रहदारी नसल्यामुळे मोठी दुर्घटना टळली.. मात्र ज्या पद्धतीने हा रस्ता खचलाय ते पाहता मोठा अनर्थ टळल्याची भावना व्यक्त केली जात आहे.


भाईंदरमध्ये इमारतीचा भाग कोसळला
भाईंदर रेल्वे स्थानाका बाहेरील एका जुन्या इमारतीचा भाग कोसळ्याची घटना घडली आहे. या घटनेत कोणतीही जीवित हानी झालेली नाही.मात्र तीन जण जखमी झाले आहेत.गेल्या दोन दिवसापासून मीरा भाईंदर शहरात सतत मुसळधार पाऊस सुरु आहे. गुरुवारी सकाळी दहा च्या सुमारास भाईंदर पूर्व रेल्वे स्थानकाला लागूनच असलेल्या नवमूर्ती इमारतीचा एका बाजूकडील पहिला माळा कोसळल्याची घटना घडली आहे.घटना स्थळी पालिकेच्या अग्निशमन विभागाने पोहचून बचाव कार्य सुरु केले. त्यामुळे त्यात अडकलेल्या नागरिकांची सुटका करण्यात आली आहे. परंतु एका दुकान विक्रेत्याचा पाय मोडला गेला असून दोन जण जखमी झाले असल्याची माहिती अग्निशमन अधिकारी प्रकाश बोराडे यांनी दिली आहे.  इमारत ही ३५ वर्ष जुनी असल्यामुळे तिला रिकामं करून पाडण्याचे काम हाती घेतले असल्याची माहीती अतिक्रमण विभागाचे उपायुक्त मारुती गायकवाड यांनी दिली आहे.


संरक्षक कठडा कोसळला
मुंबई गोवा महामार्गावर महाडजवळ सर्व्हिस रोडचा संरक्षक कठडा सकाळी कोसळलाय. महामार्गावर महाडजवळ सावित्री नदीच्या किनाऱ्याला लागूनच हा सर्व्हिस रोड आहे. सकाळी हा भाग खचून कठडा कोसळला. तर नडगाव गावाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या संरक्षक भिंतीला तडे गेल्याची बाबही काल समोर आली होती. या घटनेने मुंबई गोवा महामार्गाच्या कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्न निर्माण झालाय. 


उपवन तवाल ओव्हरफ्लो
गेले दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने ठाण्यातील आकर्षणाचे एक केंद्र असणारा उपवन तलाव ओव्हरफ्लो झालाय. दोन दिवसांत तब्बल 315 मिलिमीटर पाऊस पडल्याने तलावांचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाण्यातील बरेचसे तलावांत मोठ्या प्रमाणात पाणी साठा वाढलेला असून येऊरच्या पायथ्याशी असणारा निसर्गरम्य असा उपवन तलाव काठोकाठ भरून पाणी तळ्याच्या बाहेर लागले येऊ लागलंय. तलावाच्या आजुबाजूस परिसरातही मोठ्या प्रमाणावर पाणी साचले असून ठाणे महापालिका प्रशासनाने तलावाच्या आस पास जाण्यास मनाई केलीय.


वसई-विरारमध्ये दाणादाण
गेल्या 48 तासांपासून कोसळत असलेल्या पावसानं वसई विरार नालासोपारा शहरात दाना दान उडाली आहे.. रस्ते परिसरात गुडघाभर पाणी साचल्याने नागरिकांचे हाल होत आहेत.. शाळकरी मुलांना सुट्टी दिली असली तरी चाकरमान्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होतात... नालासोपारा पूर्वेला असलेला दुबे मार्केट परिसरातील दुकाने पाण्याखाली गेल्याने व्यापारी व दुकानदारांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे..