पुणे : हुंड्यासाठी सुनेला गळफास देऊन जिवंत मारल्याची धक्कादायक घटना घडलीय. पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील पेठ गावात हा सर्व धक्कादायक प्रकार घडलाय. पूनम ढमाले असं या विवाहितेचं नाव आहे. ८ महिन्यांपूर्वी तिचे स्वप्नील ढमालेसह प्रेमविवाह झाला होता. यानंतर पूनम गर्भवती असताना पती आणि सासरच्या मंडळींनी तिच्याकडे माहेरी जाऊन पैसे आणण्यासाठी तगादा लावला होता.


नातेवाईकांचा आरोप 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 हुंड्याच्या पैशासाठी आणि गर्भपात करण्यासाठी त्यांच्याकडून पूनमचा शारिरीक आणि मानसिक छळ करण्यात येत होता असा आरोप पूनमच्या नातेवाईकांनी केलाय. अखेर पूनमने या गोष्टीसाठी नकार दिल्याने २७ सप्टेंबरला सासरच्या मंडळींनी तिला गळफास देऊन जिवंत मारलं असा आरोपही तिच्या नातेवाईकांनी केलाय.


गळफासाने मृत्यू 


 धक्कादायक बाब म्हणजे सुनेला गळफास देवून ठार मारल्यानंतर काविळीमुळे तिचा मृत्यू झाल्याचं तिच्या सासरच्या मंडळींनी सांगितलं. मात्र पूनमच्या माहेरच्या मंडळींनी यावर विश्वास न ठेवता मंचर पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली. यानंतर शवविच्छेदन अहवालात पूनमला गळफास देवून जिवंत मारल्याचे स्पष्ट झालंय.