यवतमाळ : राज्यसरकारमध्ये विलीनीकरण करावे या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. तब्बल चार महिने चालेल्या या संपामुळे प्रवाशी चांगलेच हैराण झाले होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

न्यायालयीन लढाईनंतर राज्य सरकारने २२ एप्रिलपर्यत या कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे एसटी सेवा आता कुठे पूर्वपदावर येत आहे. अशातच एका एसटी वाहकांमुळे प्रवाशांना नाहक मनस्ताप सोसावा लागल्याची घटना यवतमाळ एसटी आगारात घडलीय.


राजुरा अमरावती एसटी बसमधील वाहकाने नशेत टूल्ल होत चांगलाच धुमाकूळ घातला. राजुरा येथून या बसमध्ये बसलेले प्रवासी या दारूच्या नशेत टूल्ल वाहकामुळे चांगलेच वैतागले.


अक्षय बट्टे असे या वाहकाचे नाव आहे. त्याने एवढी दारू ढोसली होती की, प्रवाशांना अव्वाच्या सव्वा रकमेचे तिकीट त्याने फाडून दिले. राजुरा ते अमरावती या प्रवासासाठी त्याने चक्क 800 रुपयांचे तिकीट फाडले.


त्यानंतर कशाचेही भान नसलेला हा मद्यपी वाहक बसमध्ये खाली लोळला. अखेरीस यवतमाळमध्ये ही बस थेट अवधुतवाडी पोलीस ठाण्यात आणली गेली. वाहतूक नियंत्रकाने तक्रार दाखल केली. त्यानुसार गुन्हा दाखल झाला. मात्र, यामुळे प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला.