...म्हणून तो महिलांचे कपडे घालून फिरतो, कारण वाचून बसेल धक्का
नाशिकमधील मालेगावमधून एक धक्कादायक बातमी समोर आली. एक व्यक्ती महिलांचे कपडे घालून फिरत असल्याने लोकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. मध्यरात्री व्यक्तीला अशा स्थितीत पाहिल्यानंतर अनेकदा थरकाप उडतो.
Man Wearing Women Cloths Video Viral: नाशिकमधील मालेगावमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एक व्यक्ती महिलांचे कपडे घालून फिरत असल्याने लोकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. मध्यरात्री व्यक्तीला अशा स्थितीत पाहिल्यानंतर अनेकदा थरकाप उडतो. विशेष म्हणजे पुरुष स्त्रीच्या वेषात वावरत असल्याने दहशत निर्माण झाली आहे. त्यात तो संपूर्ण चेहरा रुमालाने झाकत असल्याने त्याला पाहताच धडकी भरते. इंदिरानगर, पारिजात कॉलनी, डीके चौक, विठ्ठलनगर आणि जिजाऊनगर परिसरात व्यक्ती महिलांना त्रास देत असल्याचं समोर आलं आहे. स्त्री वेशात असलेला पुरुष मनोरुग्ण असल्याची प्राथमिक माहिती आहे. पण त्याच्या अशा वागण्याने नागरिक त्रस्त असल्याचं समोर आलं आहे.
सध्या मालेगावमध्ये या मनोरुग्ण व्यक्तीची जोरदार चर्चा आहे. महिलांची अंतर्वस्त्रे चोरण्याची त्याला सवय असल्याची माहिती समोर आली आहे. नागरिक मध्यरात्री किंवा पहाटे घराबाहेर जाण्यास धजावत नाही. काही दिवसांपूर्वी ही व्यक्ती सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाली होती.
अरे बापरे! रस्त्यावर आला भला मोठा अजगर, पण डिलिव्हरी बॉयनं...Video Viral
तो मुलांचे विचित्र आवाज काढत पाठलाग करतो. त्यामुळे त्याला पाहताच धाकधूक वाढते. या मनोरुग्ण व्यक्तीचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील रहिवाशी करत आहेत.