राज्यात लॉकडाऊन होणार की नाही, काय म्हणाले आरोग्यमंत्री राजेश टोपे?
वाढता कोरोना आणि लॉकडाऊन याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचं मोठं विधान
मुंबई : राज्यात कोरोनाची आकडेवारी दिवसागणिक वाढत आहे. राज्यात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. आता प्रश्न हा आहे की लॉकडाऊन होणार आहे की नाही. नव्या व्हेरिएंटनं महाराष्ट्राची चिंता वाढवली आहे. ओमायक्रॉन आणि डेल्टासाठीचे उपचार वेगवेगळे आहेत. त्यामुळे आरोग्य विभागासमोरही हे सर्वात मोठं आव्हान असल्याचं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.
कठोर निर्बंध राबवणं हे शासनासमोर सर्वात मोठं आव्हान आहे. संक्रमण वाढू नये यासाठी उपाययोजना करणं हे प्रशासनाचं प्राधन्य आहे. त्यामुळे कठोर निर्बंध राबवण्यात आले आहेत. राज्यभरात कोरोना चाचण्या राबवण्यात येत आहे. मेट्रोसिटीमध्ये पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे.
येत्या काळात परिस्थिती पाहून आणखी वेगळे निर्णय घेण्यात येतील. लॉकडाऊनची भीती कुणीही घालू नये, तूर्तास लॉकडाऊन नाही असं यावेळी बोलताना राजेश टोपे म्हणाले. निर्बंध वाढवले पाहिजेत. लॉकडाऊनबाबत सध्या तरी कोणतीही चर्चा झाली नाही, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.
तूर्तास लॉकडाऊनची शक्यता नाही पण लॉकडाऊन नाही, निर्बंध कडक होणार. कोरोना रुग्णसंख्या 12 ते 15 हजारावर पोहोचण्याची भीती असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली. तूर्तास लॉकडाऊन होणार नाही. राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीमुळे सर्वसामान्य नागरिक आणि व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.