यंदाच्या गुढीपाडव्याला घरच्या घरी बनवा झटपट हेल्दी मिक्स फ्रुट श्रीखंड; जाणून घ्या Recipe..
तुम्ही तुमच्या घरी या हेल्थी डिश बनवून खूश करु शकता. आता आम्ही तुम्हाला गुढीपाडव्याच्या निमित्ताने हेल्दी मिक्स फ्रूट श्रीखंड घरच्या घरी कसं बनवायचं याबद्दल सांगणार आहोत.
मुंबई : हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढी उभारली जाते. गुढीपाडवा म्हणजे नववर्ष. हा सण महाराष्ट्रामध्येही मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गुढीपाढवा येतोय म्हटल्यावर त्याची जोरदार तयारीही सुरू झाल्याचं पहायला मिळतंय. अशातच तुम्ही तुमच्या घरी या हेल्थी डिश बनवून खूश करु शकता. आता आम्ही तुम्हाला गुढीपाडव्याच्या निमित्ताने हेल्दी मिक्स फ्रूट श्रीखंड घरच्या घरी कसं बनवायचं याबद्दल सांगणार आहोत. घरी बनवलेलं हे श्रीखंड तुम्ही पूरीसोबतही खाऊ शकता. ही रेसिपी महाराष्ट्रात बनवली जाते. चाला तर मग जाणून घेवूयात याची रेसिपी
साहित्य
• ३ कप दही
• स्टीव्हिया पावडर (पर्यायी)
• १-२ आंबे
• 1 सफरचंद
• 1 नाशपाती
• 1 डाळिंब
• वेलची (इलायची)
• काही केशर (केसर)
• १ टेबलस्पून कोमट दूध
• चिरलेला बदाम
पद्धत
• एका वाडग्यात, कोमट दुधात केशर घाला आणि ते भिजण्यासाठी ठेवा. दही स्वच्छ मलमलच्या कपड्यात ठेवा आणि 30-40 मिनिटे लटकवा.
• लटकवलेलं हे दही घट्ट आणि मलईदार असावं. तुम्ही स्टीव्हियाने दही गोड करू शकता किंवा एक आंबा मिक्स करून दह्यात फेटू शकता.
• दह्यात केशर दूध आणि वेलची घालून ते चांगलं मिसळा. सफरचंद, नाशपाती आणि आंबाचे लहान लहान चौकोनी तुकडे करा त्यात टाका. यानंतर त्यात डाळिंबाच्या बिया टाका.
• यानंतर सगळी फळं एकत्र मिक्स करा आणि एका भांड्यात टाका, श्रीखंडाचा एक स्कूप त्याच्यावर घाला, सर्व्ह करण्याआधी वरुन त्यावर बदाम टाका