पुणे : हृदय घेऊन जाणाऱ्या अॅम्ब्युलन्सला प्राधान्य देण्यासाठी पुण्यात  मुख्यमंत्र्यांच्या गाड्यांचा ताफा काही क्षणासाठी थांबविण्यात आला. एरवी एखाद्या राजकीय नेत्यांच्या गाड्यांचा ताफा निघाला म्हणजे रस्ते रिकामे केले जातात. रस्त्यावरील इतर गाड्या थांबविल्या जातात. परंतु ह्रदयाचा प्रवासासाठी शुक्रवारी चक्क मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यालाच काही क्षण थांबावे लागले. हे २०१५ पासूनचे पुण्यातील १०० वे ग्रीन कॉरिडोर होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पुणे पोलिसांनी दाखविलेल्या प्रसंगावधानाचे ट्विटरवरून कौतुक केले. आणि पोलिसांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारली.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ह्रदयाचा प्रवासासाठी शुक्रवारी चक्क मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यालाच काही क्षण थांबावे लागले. शुक्रवारी संध्याकाळी अवयवदान झालेले एक हृदय ग्रीन कॉरिडोरद्वारे पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये नेले जात होते. यासाठी ग्रीन कॉरिडोर तयार करण्यात आला होता. परंतु हे हृदय वाहून नेत असलेली अॅम्ब्युलन्स आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाहनांचा ताफा एकाचवेळी समोरासमोर रस्त्यावर आला. यावेळी पोलिसांनी अॅम्ब्युलन्सला पुढे जाण्यास प्राधान्य दिले. सोलापूर येथून हे ह्रदय पुण्यात आणण्यात आले होते. सोलापुरातील यशोधरा रुग्णालयात १९ वर्षीय मुलाला ब्रेन हमरेजमुळे ब्रेन डेड घोषित करण्यात आले होते.



मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पुणे पोलिसांनी दाखविलेल्या प्रसंगावधानाचे ट्विटरवरून कौतुक केले. आणि पोलिसांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारली आहे.