वाल्मिक जोशी, जळगाव : जळगाव जिल्ह्यात उन्हाचे तापमान वाढले असल्याने अन्न आणि पाण्याच्या शोधात माकडाची टोळी ही पिलखेडा गावात आली असता एक माकडाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. गावातील सर्वांनी भूतदया दाखवत मानवप्रमाणे माकडावर अंत्यसंस्कार करत दशक्रिया विधी केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जळगाव जिल्ह्यातील पीलखेडा हे एक गाव आहे. या ठिकाणी माकडाची टोळी अन्न आणि पाण्याच्या शोधात गावात आले असता त्यातील एक माकडाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. माकडाला वाचविण्यासाठी गावातील काही नागरिकांनी त्वरित जळगाव पशु वैद्यकीय रुग्णालयात भरती केले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. गावात माकड मेल्याने गावकऱ्यांनी त्या माकडाला गावात आणून माणसांप्रमाणे अंत्यसंस्कार करत गावभर अंत्ययात्रा काढली.  


दहा दिवसांनी माकडाचा दशक्रिया विधी संपन्न झाला यात संपूर्ण गावातील तरुणांनी मुंडन केले. तसेच 11 व्या  दिवशी गंधमुक्ती करून सर्व गावाने वर्गणी गोळा करत संपूर्ण गावाला जेवण देखील ठेवण्यात आले. यात दहा दिवस गावाने सुतक पाळले असून हनुमान चालीसाचा जाप गावकऱ्यांकडून करण्यात आला.


एकीकडे हनुमान चालीसा वरून राजकीय वातावरण तापले आहे. मात्र पीलखेड गावात माकडाच्या मृत्यूनंतर जी भूतदया दाखवली त्याच सर्वत्र कौतुक होत आहे.