मुंबई : मुंबईसह उपनगरातही मोठ्या प्रमाणात उन्हाचा कडाका वाढला आहे. उकाड्याने नागरिक पुरते हैराण झाले आहेत. आता हवामान विभागाने पुन्हा एकदा अलर्ट दिली आहे. विदर्भात पुन्हा उष्णतेची लाट येणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विदर्भात 7 ते 11 मे दरम्यान वर्धा, चंद्रपूर, अमरावती, अकोला, यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा अंदाज आहे. नागपुरात 9 मे ते 11 मे दरम्यान कडाक्याचा उन्हाळा असेल. 


बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्यानं 8 मे ला संध्याकाळी चक्रीवादळात रुपांतर होणार आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या तापमानात पुढचे 2-3 दिवस पुन्हा वाढ होणार आहे. 


भारतात पुन्हा एकदा चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. एकीकडे कामलीची वाढणारी उष्णता आणि त्यात होणारा अवकाळी पाऊस असं विचित्र हवामान सध्या भारतात आहे. अशा परिस्थितीमध्ये आता भारतातील काही भागांना चक्रीवादळाचा धोका आहे. 


दक्षिण आंदमानकडे समुद्रकिनाऱ्यावर कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं आहे. त्यामुळे पुढच्या आठवड्यात आंध्र प्रदेश-ओडिसा भागांमध्ये चक्रीवादळाचा धोका निर्माण होऊ शकतो. याबाबत हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी महत्त्वाची माहिती दिली.