Heat Wave : विदर्भात उष्णतेची तीव्र लाट, या मोसमातील रेकॉर्डब्रेक तापमान
नागपूरसह संपूर्ण विदर्भात तापमानात कमालीची वाढ झाली आहे.
नागपूर : विदर्भात उष्णतेची तीव्र लाट पाहायला मिळत आहे. चंद्रपूरमध्ये आज 46.4 अंश सेल्शिअस तापमानाची नोंद झाली असतानाच नागपुरातही या मोसमात पहिल्यांदाच 45 अंशाच्या वर तापमान गेलं आहे. नागपुरात आज 45.2 अंश सेल्शिअस तापमानाची नोंद झालीये.
राज्यात उन्हाचा कहर सुरुच आहे. येत्या 4 दिवसांत विदर्भामध्ये उष्ण लहरींचा अंदाज वर्तवण्यात आलाने नागरिकांना उन्हाचा तीव्र चटका सहन करावा लागणार आहे. 2 मे पर्यंत तीव्र उष्ण लहरींचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
जळगाव जिल्ह्यातील तापमान उच्चांकी 45.9 अंशांवर पोहचलंय. उष्ण वाऱ्यांमुळे उष्माघाताचा धोका वाढला आहे. त्यामुळे 12 ते 4 दरम्यान बाहेर येण्याचे टाळावे असं आवाहन केलं गेलं आहे.
शहर तापमान
चंद्रपूर 46.4
अकोला 45.8.
अमरावती 45.0
नागपूर 45.2
वर्धा 45.5
यवतमाळ 45.2