नागपूर : Monsoon Update News : कोकणात मान्सूनपूर्व पावसाची जोरदार बॅटिंग (Heavy pre monsoon rains in Konkan) तर विदर्भात सूर्यनारायणाची तुफान इनिंग नागपूर केरळात दाखल झाला आहे. मान्सून महाराष्ट्राच्यावेशीवर आहे. राज्यात काही ठिकाणी सर्वजण प्रतीक्षा करत आहे. विदर्भात मात्र सूर्यनारायणाचा इरादा काही औरच दिसून आला. (Heatwave in Vidarbha) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विदर्भवासियांना काल सूर्याने अक्षरशः होरपळून काढले. चंद्रपूरमध्ये पारा 46 अंश पार होता. तर वर्धा आणि नागपूर येथे पारा 45 अंश सेलिअस पलीकडे होता.त्यामुळे नवतपाच्या अखेरच्या टप्प्यात सूर्याने विदर्भातून तडाखा दाखवलाच. यंदा मार्च महिन्यापासूनच विदर्भात सूर्याचा प्रकोप जाणवत आहे. 


मे महिन्यात विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये 45, 46 अंशावर पारा होता. त्यामुळे यंदा नवतपा चांगलाच तापदायक ठरणार अशी धास्ती विदर्भवासीयांना होता.. मात्र नवतपाच्या सुरुवातीला पावसाच्या सरी कोसळल्या त्यानंतर तापमानात उकाडा प्रचंड वाढला मात्र उष्णतेची तीव्रता फारशी वाढली नव्हती.  दरम्यान मे अखेरीस इकडे मान्सून कर्नाटकात पोहोचल्यानंतर आता महाराष्ट्रात कधीपण दाखल होणार याची सर्वांना प्रतीक्षा होती.


मान्सूनची प्रतीक्षा असताना नवतपाच्या अखेरच्या टप्प्यात काल विदर्भवासियांना मात्र सूर्याचा चांगलाच प्रकोप झेलावा लागला. चंद्रपूरला आज 46.8 अंश सेल्शिअस तापमानाची नोंद करण्यात आली. नागपुरात 45.0 अंश तापमान होते,तर वर्धा येथे पार 45.4 अंशावर पारा होता. 


सकाळपासूनच लाही लाही 


तीन दिवसांपूर्वी विदर्भात पडलेल्या पावसाच्या सरींमुळे उष्णतेची तीव्रता कमी झाली होती. मात्र सकाळपासूनच उष्णता जाणवत होती. घराबाहेर पडल्यानंतर चटके बसत होते. संध्याकाळी सातपर्यंत उष्णतेच्या झळा जाणवत होत्या.