COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रत्नागिरी : रत्नागिरीमध्ये काल पासून दमदार पावसाने हजेरी लावली आहे. पावसामुळे नद्यांना पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. लांजा, मंडणगड, दापोली, खेड राजापूर, रत्नागिरीमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली आहे.  त्यामुळे जिल्ह्यातील नद्यांच्या पाणीपातळीतही वाढ झालेली आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 


रत्नागिरीसह संगमेश्वर तालुक्याच्या खाडीभागात जोरदार वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू आहे. बारा तासांपेक्षा अधिक तास कोसळणाऱ्या पावसामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. अनेक ठिकाणी दरड कोसळली तसेच झाडे उन्मळून पडली आहेत. रस्त्यालगतची दरड कोसळून रस्त्यावर आली, अविश्रांत कोसळणाऱ्या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी आहे. सखल भागात पाणी साचल्याने पादचाऱ्यांना मार्ग काढताना कसरत करावी लागत आहे. मान्सूनच्या पहिल्या पावसातच शास्त्री खाडी दुथडी भरून वाहत आहे.