कोल्हापूर: जिल्हाभर कोसळत असलेला मुसळधार पाऊस. त्यामुळे धरणाचे पाणलोट क्षेत्र आणि नदीपात्रातील पाणीपातळीत होणारी वाढ. यामुळे कोल्हापुरची वाहतूक विस्कळीत झाली आहे. पावसाची संततधार कायम असल्याने पंचगंगा नदीच्या पाणी पातळी ३८ फूट ४ इंचावर पोहोचली आहे. तर,  धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडल्याने जिल्ह्यातील ६२ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तसेच, जिल्ह्यातील ५ राज्यमार्ग, १८ जिल्हामार्गही बंद झाले आहेत.


जिल्ह्यात पूरस्थिती


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोल्हापूर जिल्ह्यातील पूरस्थिती कायम आहे. बाजारभोगाव गावामध्ये कासारी नदिचं पाणी घुसलं. अधिच कासारी नदिच पाणी कोल्हापूर राजापूर रस्त्यावर आल आहे. यामध्ये आता कासारी नदिच पाणी बाजारभोगाव  येथे आल्यान हा मार्ग वाहतूकीसाठी ठप्प झालाय.


मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा


दरम्यान, येत्या २४ तासांत मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पश्चिम बंगालच्या वायव्येकडे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्याचबरोबर गुजरातच्या वर असलेली चक्रीय वातस्थिती आणि रायपूरजवळील चक्रीय वातस्थिती कायम आहे. त्यामुळे रविवारपासून पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता असल्याचे प्रादेशिक हवामान विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी स्पष्ट केले. दरम्यान आज दुपारी १ वाजता समुद्राला मोठी भरती आहे. ही भरती मोसमातील सर्वात मोठी भरती असेल.. त्यामुळे प्रशासनानं सतर्कतेचे आदेश दिलेत.