मुंबई : पावसाने पुन्हा एकदा दणका दिलाय. कोकणात गेले दोन दिवस पाऊस सुरुच आहे. आज मुंबई शहर आणि उपनगरात जोरदार पाऊस कोसळत आहे. नवी मुंबई, ठाणे येथे जोरदार पाऊस पडत आहे. दरम्यान, सोसाट्याचा वारा आणि मुसाळधार पावसामुळे दापोली तालुक्यात चार मच्छिमार बोटींना जलसमाधी मिळाली. 


रत्नागिरीत दोन दिवसांपासून पाऊस


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रत्नागिरी जिल्ह्यात दोन दिवसांपासून पाऊस कोसळत आहे. चिपळूण, संगमेश्वर येथील नद्या दुथडीभरून वाहत आहेत. तर दापोलीत आंजर्ले खाडीत ३ आणि हर्णेमध्ये १ अशा चार बोटी बुडाल्या. रत्नागिरी जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळतोय. त्यामुळे वादळी वाऱ्याच्या तडाख्यामुळे नांगरून ठेवलेल्या एकुण चार बोटी लाटांचा मारा आणि एकमेकावंर आपटून बुडू लागल्या. आणि त्यातील दोन बोटींना जलसमाधी मिळाली. 


बोट बुडत असल्याचं लक्षात येतात बोटीवरील सर्व खलाशांनी पाण्यात उड्या मारल्या त्याचबरोबर त्याच बोटींच्या बाजूची तिसरी बोट बुडू लागली आणि त्यादेखील बोटीला जलसमाधी मिळाली. आंर्जार्ले खाडीच्या बुजूला असलेल्या हर्णेमध्ये एका बोटीला जलसमाधी मिळाली. दोन बोटीवरचे 8 खलाशी अद्यापही बेपत्ता असून ७ खलाशांना बाचवण्यात स्थानिकांना यश आलंय.


सिंधुदुर्गात नदी-नाले ओसंडून 


सिंधुदुर्गात पावसानं चांगलाच धुमाकूळ घातलाय. पावसाच्या मोठ मोठ्या सरी कोसळतायत.  जिल्ह्यात १३९ मिमी पाऊस पड़लाय. सर्व नदी-नाले ओसंडून वाहतायत. पावसानं उसंतच घेतली नसल्यामुळे सर्वत्र पुरसदृश्य स्थिती निर्माण झालीय. दोड़ामार्ग तालुक्यातील भेड़शी पुलावर पाणी आल्यामुळे वाहतुकीचा मार्ग बंद आहे. तर मालवण तालुक्यात मसूरे आणि बागायत या भागातही पुराचे पाणी रस्त्यावर आलंय. 


कणकवली तालुक्यातही पावसाचा जोर कायम असून कासरल रस्त्यावर पाणी येऊन रस्ता बंद झालाय. कुडाळ तालुक्यातही आंबेरी पुलावर पाणी आलंय. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. हवामान विभागाच्या अंदाजानुसार आणखी दोन दिवस पाऊस असाच कोसळणार आहे. त्यामुळे प्रशासनाकडून सावधानतेचा इशारा देण्यात आलाय. 


पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर 


कोल्हापूर जिल्ह्यातील पश्चिम भागात पावसाचा जोर चांगला असल्यामुळं राधानगरी धरणाचे स्वयंमचलीत दरवाजे पुन्हा एकदा उघडलेत. धरणाचे सातही दरवाजे दुपारी साडेबारा वाजता उघडले असुन धरणातून 12 हजार 600 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु आहे. 


तर विजनिर्मितीसाठी 2 हजार 500 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रास पाऊस मुसळधार पडत असल्यामुळं भोगावती नदी काठच्या गावांना दक्षतेचा इशारा देण्यात आलाय.