पावसाचं Return तिकीट कधी निघणार, परततोय म्हणता म्हणात धुमाकूळ घालतोय वरुणराजा
पावसाच्या हाहाकारने बळीराजा चिंतेत तर, नागरिक परतीच्या पावसाच्या प्रतीक्षेत
मुंबई : बंगालच्या उपसागरात (Bay of Bengal) निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता (heavy rain) वर्तवण्यात येत आहे. प्रामुख्यानं विदर्भातील काही भागांत पुढील दोन दिवस जोरदार पावसाचा अंदाज असून, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातही काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. कोकणातही काही भागांत हलका पाऊस बरसण्याची शक्यता आहे. सतत मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे बळीराजा चिंतेत आहे, तर दुसरीकडे नागरिक परतीच्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. (heavy rain in maharashtra)
येवल्यामध्ये पावसानं हाहाकार माजवलाय. सतत कोसळणा-या पावसामुळे अनेक ठिकाणी पिकांचे नुकसान झालं आहे. (Damage to cropsdue to heavy rain) कोमटगाव इथं एका शेतकऱ्याचा पाच एकर मका जमीनदोस्त झालाय. वादळी वाऱ्यासह पाऊस आल्यानं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. त्यामुळे नुकसान भरपाईची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. (farmers worried)
पुण्यातल्या भोर तालुक्यातील करंदी गावचा रस्ता पावसामुळं वाहून गेलाय. भाटघर धरणं ओव्हरफ्लो झाल्यानं रस्ता वाहून गेला. आता अरुंद झालेला हा रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनला असल्याचं चित्र आहे.
एसटी बस किंवा मालवाहू जड वाहनं धरणाच्या पाण्यात पडून मोठा अपघात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे तात्काळ हा रस्ता दुरुस्त करा अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत. (heavy rain in maharashtra)