मुंबई : मुंबई, ठाणे, कल्याणमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. तसेच येत्या 24 तासात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. ऐरोली, रबाळे, घणसोली परिसरात विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. तर मालाड, गोरेगाव, कांदिवलीतही जोरदार पाऊस झाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ठाण्यामध्ये यंदा गेल्या दहा वर्षांमधला विक्रमी पाऊस झालाय. उशिरा आला असला तरी बुधवारपर्यंत शहरात 4170.21 मिलीमीटर पावसाची नोंद झालीये. 10 वर्षांपूर्वी 3560.70 मिलिमीटर पाऊस झाला होता. पावसामुळे ठाण्यातही काही भागांमध्ये पुरपरिस्थिती निर्माण झाली होती. 



दिव्यात अनेक भागांमध्ये घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलं होतं. अद्याप पावसानं विश्रांती घेतलेली नाही. गेल्या २४ तासांमध्ये ४२ मिलिमीटर पाऊस झालाय. ठाणे शहरासह जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे धरणं भरली असून यंदाचा पाणीप्रश्न सुटलाय.