मुंबई / पुणे : आज संध्याकाळी नवी मुंबईत आणि पुण्यात जोरदार पाऊस झाला. मुंबई दुपारनंतर ढगाळ वातावरण होते. काही भागात पावसाचा शिकडकावा झाला. दरम्यान, पुण्यात पुराच्या आठवणी ताज्या असतानाच पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराला मेघगर्जनासह विजांच्या कडकडाट होत जोरदार पाऊस पडला. परतीच्या या पावसाने पुन्हा दणका दिला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुणे शहरात तासभर पावसाने झोडपून काढले. या पावसाने रस्ते, चौक जलमय झाले होते. त्यामुळे वाहतुकीच्या कोंडीत भर पडली. दरम्यान, अवघ्या तासाभरात ४३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. डेक्कन, कोथरूड, कात्रज, बिबवेवाडी, शहराचा मध्य भाग येथे पावसाने अक्षरशः दाणादाण उडविली. आंबिल ओढयाचा भागही पुन्हा पावसाने बाधित झाला.



गेल्यामहिन्यात २५ तारखेला पावसाने पुण्यात हाहाकार उडविला होता. आंबिल ओढयाच्या जवळपासच्या परिसरातही शहराच्या अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली होती. त्यात २० पेक्षा जास्त लोकांना आपले जीव गमवावे लागले. याला काही दिवस होत नाहीत, तोच शुक्रवारी पुन्हा पावसाने तडाखा दिला. पुणे, पिंपरीसह शहराच्या विविध भागांत तासभर जोरदार पाऊस झाला.