सांगली : चांदोली परिसरात अति जोरदार पाऊस झाला आहे. गेल्या २४ तासात ७० मिनिमिटर पावसाची नोंद झाली आहे. पाऊस जोरदार वाऱ्यासह कोसळत आहे. या पावसाने वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.  या ठिकाणी तीन आठवड्यापासून पावसाने पूर्णपणे उघडीप दिली होती. मात्र पुन्हा पावसाला चांगली सुरुवात झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वारणा धरणात सध्या २३.९२  टीएमसी पाणीसाठा तर धरणामध्ये ६९.५४ टक्के पाणीसाठा झाला आहे. वारणा अर्थात चांदोली धरण परिसरात मागील दोन दिवसा पासून पावसाने हजेरी लावली आहे. वाऱ्याचा वेग वाढला आहे. चांदोली परिसरात गेल्या पंधरा दिवस ते तीन आठवड्यापासून पावसाने पूर्णपणे उघडीप दिली होती. पुन्हा पावसाने या परिसरात हजेरी लावली. 



चांदोली येथील वीज निर्मिती पूर्णतः बंद आहे. त्यामुळे नदी पात्रात पाण्याचा विसर्ग ही बंद आहे. वारणा नदी काही ठिकाणी कोरडी पडली आहे. पावसाने सुरुवात केली असली तरी पावसाला जोर नव्हता त्यामुळे परिस्थिती जैसे होती. मात्र आता या ठिकाणी पावसाचा जोर वाढला आहे. पाऊस कोसळतच आहे.