हिंगोली : जिल्ह्यात काही भागात शुक्रवार सायंकाळपासून मुसळधार पाऊस कोसळत आहेत. या पावसाचा एक बळी गेला असून एक जण बेपत्ता आहे. मुसळधार पाऊस सुरु असताना बुडकी नाल्याला पूर आला होता. यावेळी पुराच्या पाण्यात बैलगाडी घालून पलिकडे येणाऱ्या वृद्ध दाम्पत्यासह बैलगाडी पुरात वाहून गेली. वाहून गेल्या दाम्पत्यापैकी महिलेचा मृतदेह हाती लागला आहे. तर या महिलेचे ५५ वर्षीय पती बेपत्ता आहेत. त्यांचा शोध घेण्यात येत आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 काही भागात जोरदार पाऊस झाला, कळमनुरी तालुक्यातील असोलवाडी परिसरातील बुडकी नाल्याला पूर आला होता. गावातील आप्पाराव शिंदे यांच्याकडे सालगडी असलेले ५५ वर्षीय कुंडलिक असोले यांनी पुरातून बैलगाडी पुढे नेण्याचा निर्णय घेतला. पण पुराच्या पाण्याचा जोर अधिक असल्याने पुरातून बैलगाडी वाहून गेली. या बैलगाडीत असोले यांच्या पत्नी धुर्पताबाई सोबत होत्या. गाडीला जुंपलेले बैल पुराबाहेर बाहेर आलेत. 


दरम्यान, बैलगाडीत असलेले वृद्ध दाम्पत्य मात्र या पुरात वाहून गेले. रात्रभर ग्रामस्थांच्या मदतीने या दोघांचा शोध सुरू होता. सकाळी  महिलेचा मृतदेह कळमकोंडा परिसरातील पुयना तलावात सापडला. तर कुंडलिक असोले यांचा अजून ही शोध सुरु होता. या घटनेने असोलेवाडीवर शोककळा पसरली आहे. नागरिकांनी पुराच्या पाण्यात जाण्याचा, वाहन टाकण्याच धाडस कुणी ही करु नये, असे आवाहन उपविभागीय अधिकाऱ्यांनी केले आहे.