जळगाव : राज्यातील काही भागांत गारपिटीसह अवकाळी पाऊस पडण्याचा इशारा वेधशाळेनं दिल्यानंतर, आज जळगाव शहरात काही वेळ पावसाच्या सरी कोसळल्या. अचानक आलेल्या या अवकाळी पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. 


अचानक आकाशात ढग दाटून आले


आज सकाळपासूनच जळगावात ऊन सावलीचा खेळ सुरु होता. त्यातच अचानक आकाशात ढग दाटून आले आणि पावसाच्या धारा बारसल्याने शेतकऱ्यांची मात्र चिंता वाढली. अगदी काही मिनिटांच्या या सरी होत्या त्यामुळे सध्या तरी जळगावात नुकसानकारक पाऊस नसल्याने शेतकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास टाकलाय.