मुंबई / रत्नागिरी : Heavy rains in Konkan : राज्यासाठी पुढचे 48 तास महत्त्वाचे आहेत. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तसेच विदर्भ आणि मराठवाड्यातही मुसळधार सरींची शक्यता वर्तविण्यात आली आहे. कोकणमध्ये गेल्या चार दिवसांपासून धो धो पाऊस कोसळत आहे. अद्याप पावसाचा जोर कायम असल्याने खेडमधील जगबुडी नदी (Jagbudi river at dangerous level, 30 villages on alert) धोकादायक पातळीपर्यंत पोहोचली आहे. अद्याप खेड शहरात अद्याप पाणी आलेलं नाही. मात्र जगबुडी नदी काठच्या सुमारे 25-30 गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात दिला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रत्नागिरी जिल्ह्यातील दोन तालुक्यातील दोन नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. यात खेडमधील जगबुडी आणि राजापूर मधील कोदवली या नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. जगबुडी नदी काठच्या सुमारे 25-30 गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात दिला आहे. यात अलसुरे निळीक, भोस्ते, शिव बुद्रुक आदी गावांचा समावेश आहे. 


खेड पालिका हद्दीत नदीकाठी झोपडपट्टी आहे. तेथील 37 कुटुंबांना गेल्या आठवड्यात सुरक्षित स्थळी हलवले आहे. तसेच केंद्रीय आपत्ती व्यवस्थापन रेस्क्यू पथकचे 18 जवान खेड येथे दाखल झाले आहे. खेड शहरात मटण मार्केटजवळ पाणी कायम आहे.नारंगी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.