मुंबई :  Rain in Marathwada : कोकणात अतिवृष्टी झाली आहे. (Rain in Konkan) रत्नागिरीतील दापोलीत 357 मिमी, चिपळूणमध्ये 207 मिमी पाऊस तर रायगड जिल्ह्यात मुरूडमध्ये ढगफुटी झाली असून गेल्या 24 तासांत 475 मिमी पाऊस झाला आहे. आता तर मराठवाड्यातही ( Marathwada) पावसाचा (Rain) धुमाकूळ दिसून येत आहे. नदी, नाल्यांना पूर, धरणे भरली आहेत. अनेक भागात अतिवृष्टी झाली आहे. (Heavy rains in Marathwada, heavy rains in many areas in Maharashtra)


कोकणात किती हा पाऊस पडला, आकडेवारी पाहून डोळे गरगरतील


मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मराठवाड्यातही गेल्या तीन ते चार दिवसांपासून जोरदार पाऊस आहे. अनेक छोटी मोठी धरणं भरलीयत. नांदेड, परभणी, हिंगोली, बीडमध्ये पूरस्थिती आहे. नांदेड जिल्ह्यात मुसळधार पावसानं हजेरी लावली असून 4 तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झालीये.अनेक शिवारात नदीकाठच्या जमिनी आणि पिकं खरडून गेलीत. सलग तीन दिवस परभणी जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरुच आहे. गोदावरीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे. हिंगोली जिल्ह्यालाही पावसानं झोडपून काढलंय. त्यामुळे जिल्ह्यातील ओढे नाले नद्याना पुर आलाय. अनेक गावांचा संपर्क तुटलाय. बीड शहराला पाणीपुरवठा करणारं बिंदुसरा धरण शंभर टक्के भरलंय. 



निम्म्या मराठवाड्याची तहान भागवली


मराठवाड्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसानं निम्म्या मराठवाड्याची तहान भागवलीय मराठवाड्यातील दुधना, माजलगाव, बिंदुसरा, विष्णुपुरी, सिद्धेश्वर, मनार ही धरणं पूर्ण भरलीयेत. तर इसापूर आणि येलदरी धरण भरण्याच्या मार्गावर आहेत. अनेक लहान मध्यम प्रकल्प सुद्धा ओव्हरफ्लो झालेत. लातूरची तहान भागावणा-या मांजरा प्रकल्पात 51 टक्के पाणीसाठा झाल्यानं लातूरकरांची पाण्याची चिंता मिटलीय. जायकवाडी धरण मात्र अजूनही भरण्याच्या प्रतीक्षेत आहे, धरणात  45 टक्के पाणीसाठा आहे.


नागपुरात पावसाचा जोर वाढला


मराठवाड्यानंतर विदर्भात चांगला पाऊस कोसळत आहे. नागपुरात पावसाचा जोर वाढला आहे. (Rain in Nagpur) शहरात अनेक ठिकाणी सखोल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. नागपुरात रात्रीपासून पावसाची संततधार सुरू आहे. पुढच्या 24 तासात  नागपूरसह विदर्भात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. बंगालच्या खाडीत कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं असून ते पुढे सरकत आहे. त्याचा परिणाम दिसून येत आहे.