औरंगाबाद / बीड : Rains News - Heavy rains in Marathwada : मराठवाड्यात अतिवृष्टीने धुमाकूळ घातला आहे. (Rains in Marathwada) तर अतिवृष्टीने गेल्या चार दिवसांत तब्बल 12 जणांचा बळी गेला आहे.  औरंगाबाद जिल्ह्यातील 11 महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे. जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, नांदेड, हिंगोलीत अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. (Major damage in Aurangabad, Jalna, Beed, Latur, Osmanabad, Nanded, Parbhani, Nanded, Hingoli)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील सात जिल्ह्यात दोन लाख 22 हजार 36 हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. मराठवाड्यात अतिवृष्टीने गेल्या चार दिवसांत तब्बल 12 जणांचा बळी गेला आहे. बीडमध्ये 4, नांदेडमध्ये 3, औरंगाबाद जिल्हायात 2 आणि इतर जिल्ह्यात तीन जणांचा बळी गेला आहे. 


औरंगाबाद शहराला काल संध्याकाळी ढगफुटी आणि पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. शहरात संध्याकाळनंतर अतिमुसळधार पाऊस बरसला. एका तासात 56.2 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. त्याचदरम्यान संपूर्ण शहरातील वीज गेली होती. त्यामुळे अंधारात नागरिकांना राहावे लागले होते.



लातूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून मुसळधार पाऊस बरसतोय. आज सकाळपासून लातूर शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात पावसाची रिमझिम सुरूच आहे.  काही महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण सरासरीच्या 684 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली. गेल्या तीन दिवसात झालेल्या पावसामुळे पिकांचे मोठं नुकसानही झालं आहे. 


जालन्यात पुराच्या पाण्यात तीनजण वाहून गेले. तर दोघांना वाचवण्यात यश आलंय. एकजण अजूनही बेपत्ता आहे. परतूरमधल्या बामणी गावातही ही दुर्घटना घडलीय. हे सर्वजण एकमेकांचे हात पकडून पूल पार करत होते. रात्री दहाच्या सुमाराला ही दुर्घटना घडली. 55 वर्षीय आसाराम खालापुरे यांच्या अजूनही शोध लागलेला नाही.


नांदेडमधल्या मुखेड इथं पुराच्या पाण्यात कार घातली गेली. वाहून गेलेल्या कारमधील एकाला बाहेर काढण्यात आलं. झाडावर थांबलेल्या या व्यक्तीला दोरखंडानं सुखरूप बाहेर काढण्यात आलं. कारमध्ये एकंदर तीन जण होते. त्यापैकी दोघे जण बेपत्ता आहेत. आमदार तुषार राठोड यांचे नातेवाईकही या कारमध्ये होते. त्यांचा शोध सुरू आहे.