मुंबई :  मराठवाड्यात कालपासून जोरदार पाऊस पडत आहे. काही ठिकाणी पूर आला आहे. लातूर आणि नांदेडमध्ये मुसळधार पाऊस कोसळला. तर परभणीला पावसाने चांगलेच झोडपून काढले. दरम्यान, मराठवाडा, पश्चिम विदर्भात पुढील २४ तासात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबई, ठाण्यासह कोकणातही पावसाचा अंदाज आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोकणमध्येही पावसाची शक्यता आहे. तर ठाणे, मुंबई या ठिकाणी आकाश ढगाळले राहिले. तर लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी येथे  पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबई आणि उपनगरात तुरळक पाऊस पडत आहे. तर कोकणमधील रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी चांगला पाऊस झाला.


मुसळधार पावसाने झोडपले


दरम्यान, मराठवाड्याल कालपासून मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. काही ठिकाणी पूरपरस्थिती निर्माण झाली आहे. नांदेड जिल्ह्यातील मुखेड शहर आणि तालुक्यात रात्री तुफान पाऊस झाला तर काही भागात अतिवृष्टी झाली.


तूफान पावसामुळे मुखेड शहरालगत असलेल्या मोती नाल्यास पूर आला रात्री या मार्गावरील वाहतूक बंद होती. नाल्या लगत असलेल्या स्मशान भूमीत पाणी शिरल्याने तिनी भागाच्या संरक्षण भिंती कोसळल्या. या ठिकाणी कर्मचाऱ्यांसाठी तयार केलेला निवारा शेड़ही वाहून गेली. शहरातील फुले नगर भागातील अनेक घरांमध्ये नाल्याचे पाणी शिरल्याने नागरिकांना मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागले..



मुसळधार पावसामुळे अनेक घरांची पडझड झाली. शेतामध्ये पाणी घुसले असून शेताला तलावाचे स्वरूप आले आहे. मागील 24 तासात मुखेड शहरात १३३ मिलिमीटर तर तालुक्यात सरासरी ९८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.


परभणीत जोरदार पाऊस


पुलावरून पाणी वाहत असतांना पाण्याच्या प्रवाहातून दुचाकी नेण्याचा प्रयत्न करणे दोन युवकांच्या चांगलाच अंगलट आला. परभणीच्या सेलू तालुक्यात काल जोरदार पाऊस झाला. त्यामुळे नदी ओढे नाल्यांना पुर आला होता. सेलू तालुक्यातील वालुर -बोरी रस्त्यावररील कान्हड पाटी जवळील ओढ्यावर कच्चा सिमेंटचे नळू टाकून बनवलेला पुल खचला.