ठाणे : मुसळधार पावसाचा फटका रस्ता वाहतुकीला बसला आहे. (Heavy rains in Matheran hit traffic) माथेरानमध्ये दरड कोसळल्याने (landslide at Matheran ghats) वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. मुसळधार पावसामुळे याठिकाणी दरड कोसळली असून नेरळ-माथेरान दरम्यानची वाहतूक ठप्प झाली आहे. दरड हटवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


निसर्गरम्य माथेरानमध्ये (Matheran ghats) दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. पावसाळ्यात इथले सौंदर्य आणखीन खुलून दिसते. कोरोनाच्या निर्बंधांमुळे माथेरानकडे येणाऱ्या पर्यटकांची संख्या रोडावली आहे. तसेच पावसाळ्यात माथेरानची मिनी ट्रेन बंद असल्याने माथेरानकरांना रस्तेमार्गानेच नेरळला ये-जा करावी लागते. मात्र दरड कोसळल्याने स्थानिकांसह वाहनधारकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.